कॉमर्स कॉलेज मध्ये महिला दिन साजरा

0
WhatsApp Image 2026-03-09 at 11.57.01 AM

डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये महिला दिनानिमित्त सौ. रजनीताई मगदूम, डॉ. प्रसाद मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम ॲड. वैभव पेडणेकर,  ॲड. अमित बाडकर, प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आदी उपस्थित होते.

कोल्हापूर. (प्रतिनिधी) कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रविवार,  8 मार्च रोजी डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला.

      कार्यक्रमाची सुरुवात हास्ययोग सत्राने झाली. सकाळी योगा प्रशिक्षक प्रा. मनीषा शिंदे यांनी उपस्थित महिलांना हास्ययोगाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर अल्पोपहार देण्यात आला. यानंतर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर तसेच रक्त व लघवी तपासणीसह आवश्यकतेनुसार विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

   पुढे तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र पार पडले. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निरुपमा सखदेव यांनी “महिलांचे आरोग्य समस्या आणि उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगुल यांनी “महिलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन करून महिलांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा मा. सौ. रजनीताई मगदूम उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष मा. डॉ. प्रसाद मगदूम, सचिव मा. डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक मा. ॲड. वैभव पेडणेकर,  व संचालक मा. ॲड. अमित बाडकर उपस्थित होते.

 यावेळी डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य चिदानंद पाटील, माजी प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, योगा प्रशिक्षक प्रा. मनीषा शिंदे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *