छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

0
IMG_20260309_140020

1500 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे शाहूवाडी तहसील कार्यालयामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांनी केले.

        महसूल विभागामार्फत आयोजित या शिबिरात शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही जुनी संकल्पना आता हळूहळू संपुष्टात येत असून एका छताखाली नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे, हे आपल्या भाग्याचे असल्याचेही अमर पाटील यांनी सांगितले. ते सरूड येथे आयोजित या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या अभियानांतर्गत तालुक्यातील महसूल, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, घरकुल आणि परिवहन विभागामार्फत विविध योजनांचा लाभ 1500 लाभार्थ्यांना देण्यात आला.

   यावेळी तहसीलदार सीमा सोनवणे, उपजिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पंचायत समिती सदस्य डॉ. धनश्री पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी विकास पाटील, सरपंच भगवान नांगरे, मंडल अधिकारी विकास जाधव, डॉ. एच. आर. निरंकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल निशिगंध, पशुधन अधिकारी डॉ. वृषाली सरवदे, पर्यवेक्षक अर्चना जाधव, विस्तार अधिकारी पराग कानडे, कृषी अधिकारी ए. एन. गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबिराला विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *