रयत स्पर्धा परीक्षा अॅकेडमीचे धवल यश

0
IMG_20260313_141816

रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अॅकेडमी कार्यरत

कोल्हापूर,  (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांचा निकाल सध्या जाहीर झाला आहे. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड कोल्हापूर येथील रयत स्पर्धा परीक्षा अॅकेडमीचे विद्यार्थी  भूषण मोतीराम गावडे व  सचिन सर्जेराव भोपळे ह्या दोन विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या दोन विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. त्याचा ह्या धवल यशाबद्दल त्याच्यावर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

  महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अॅकेडमी कार्यरत आहे. ह्या अॅकेडमीमार्फत महाविद्यालयातील विद्यार्थी यांना सर्वप्रकारच्या स्पर्धा परीक्षाविषयीचे मार्गदर्शन केले जाते. सध्या ह्या अॅकेडमीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचा २० विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. ह्या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, रयत स्पर्धा परीक्षा अॅकेडमीच्या संचालिका डॉ. सुप्रिया खोले, समन्वयक डॉ. समाधान बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *