कमला कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील , कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर आदी मान्यवर
कोल्हापूर, (प्रतिनिधी): ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील साहेब यांचे शुभहस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या शिक्षण, कृषी, जलसिंचन, सरंक्षण, दळणवळण इ. क्षेत्रातील मुलभूत योगदानाचा वेध घेणाऱ्या भित्ती पत्रकाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य श्री.एम.एन.जाधव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र कमला कॉलेजचे केंद्रसंयोजक प्रा.डॉ.सुजय पाटील,विद्यार्थीनी कु. अनन्या जाधव, कु.मानसी कलागते, कु.भक्ती उत्तरंडे, कु.धनश्री माने, कु.प्राज्वल साळोखे, ग्रंथपाल श्रीमती यु.आर.कदम, शारिरीक शिक्षण संचालिका श्रीमती ज्योती लेंगरे, प्रा.डॉ. सुनिता काळे इ. उपस्थित होते.


