सरूडच्या यश डवरीची ‘इन्स्पायर अवॉर्ड’साठी निवड; ग्रामस्थांकडून सत्कार
यश डवरी यांच्या या यशामुळे महात्मा गांधी विद्यालय तसेच सरूड गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे
शाहूवाडी (प्रतिनिधी): तालुक्यातील सरूड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी यश गोरक्ष डवरी याची केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 2025–26 या वर्षातील ‘इन्स्पायर अवॉर्ड’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील योजनेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सरूड ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उबाटा गटाचे तालुका उपप्रमुख निवास कदम तसेच लोकनियुक्त सरपंच भगवान नांगरे यांच्या हस्ते यश डवरी याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख गणेश पाटील, शंभूराजे कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबासो पाटील, सौरभ कदम, शामराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यश डवरी यांच्या या यशामुळे महात्मा गांधी विद्यालय तसेच सरूड गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


