भीमापूरवाडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांंचा भाजपात प्रवेश

0

त्यांचा विकास हाच आपले कर्त्यव्य असणारःआमदार शशिकला जोल्ले
निपाणी,ता.13(प्रतिनिधी)-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्र सरकारची विकासकामे व आमदार शशिकला जोल्ले यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामावर प्रभावीत होऊन भीमापूरवाडीचे काँग्रेस कार्र्येकर्ते सतीश कोंडेकर, विशाल सूर्यवंशी, उदय बेलेकर यांच्यासह त्यांच्या टीममधील 20 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे निपाणी मतदारसंघात भाजपला अधिक बळकटी मिळाली आहे.
यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी मतदार संघात आमदार म्हणून काम करताना दोन वेळा मंत्रीपदाचा सन्मान मिळाला. निपाणी मतदार संघाने दिलेले राजकीय यश हे आमच्या जोल्ले परिवारच्या यशातील मोठे यश असल्याने आपण या मतदारांच्या उपकाराला कधीही विसरले नाही. त्यामुळे आज निपाणी मतदार संघ विकासातून सुफलाम होत आहे. मतदार संघात विकासाचा डोंगर उभा राहत आहे. मतदारांनी विकासाला प्रेरणा दिली आणि आम्ही विकास कामाला बळ दिले. त्यामुळे आज शेकडो विरोधी पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करून आम्हाला बळ देत आहेत. हे कार्यकर्ते राजकारणाच्यापोटी नाही विकास कामाच्यापोटी आपल्याला पाठींबा देत आहेत. त्यामुळे आपण त्यांचा विश्‍वासाला कधीही तडा जावू देणार नाही. त्यांचा विकास हाच आपले कर्त्यव्य असणार असल्याचे सांगितले.
बीडीसी बॅकेचे चेअरमन अण्णासाहे जोल्ले यांनी आपल्या पाठीमागे राहणारा कधीही विकासापासून दूर राहणार नाही. प्रत्येकाला विकासात सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सतीश कोंडेकर, विशाल सूर्यवंशी, उदय बेळेकर, तुषार कोंडेकर, केदार सूर्यवंशी, कुबेर कोंडेकर, रोहन चव्हाण, प्रथमेश कोंडेकर, प्रथमेश कोंडेकर, उभय कोंडेकर, विशाल सूर्यवंशी, श्री.कोंडेकर, गणेश मोरे, प्रकाश साळुंके यांच्यासह त्यांच्या टीममधील 20 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, सिद्धू नराटे, हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने, भरत नसलापुरे, बाळासाहेब सदलगे, मिथुन पाटील, अरुण बिलवडे, बाबासाहेब जाधव, अलगोंडा पाटील, भरत घोसरवाडे, रेखा घोसरवाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *