भेडसगाव येथे वंध्यत्व व जंतनिर्मूलन शिबिर, पशुवैद्यकीय अँम्बुलन्स नियमित फिरतीवर ठेवण्याच्या सूचना

0
IMG-20260316-WA0063

जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह हंबीरराव पाटील (भैया)

सरूड (प्रतिनिधी) भेडसगाव : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या वतीने भेडसगाव येथे वंध्यत्व व जंतनिर्मूलन शिबिर, तसेच मका बियाणे वाटप व मिनरल मिक्सचर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी व पशुपालक बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

   कार्यक्रमादरम्यान शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या फिरत्या पशुवैद्यकीय पथकाच्या (अॅम्बुलन्स) सेवेसंदर्भात माहिती घेतली असता, ही सेवा मतदारसंघात नियमितपणे फिरत नसल्याचे निदर्शनास आले. याची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह हंबीरराव पाटील (भैया) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही अँम्बुलन्स सरूड मतदारसंघात प्रत्येक सोमवारी नियमित फिरतीवर ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

   तसेच सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांनी “१९६२” या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पशुवैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या जनावरांच्या आरोग्याबाबत वेळेवर व दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील असून पुढील काळातही अशा सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे यावेळी सांगण्यात आल

जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह हंबीरराव पाटील (भैया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *