एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचेः समरजितसिंह घाटगे

कृषी संमेलनात अभंग रिपोस्ट कार्यक्रमाने उपस्थित भक्तीसंगीतात रममाण
निपाणी,(प्रतिनिधी)-
माजी खास.अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांनी या भागात खऱ्या अर्थाने हरितक्रांती केली आहे. बंद पडणाऱ्या श्री.हालसिद्धनाथ कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे.सध्या कारखान्यांचे गळीत हंगाम सर्वसाधारणपणे 90 ते 105 दिवसापर्यंत चालत असल्यामुळे कारखाने चालविणे अवघड होत आहे.त्यामुळे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील वर्षीच्या कृषी प्रदर्शनात एआयचा वेगळा विभाग सुरू करावा असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केले.
ते येथील जोल्ले ग्रुप व श्री हालसिध्दनाथ साखर कारखाना यांच्यातर्फे सुरू असलेल्या कृषी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर संंपादना स्वामीजी, माजी खास.अण्णासाहेब जोल्ले, आम.शशिकला जोल्ले, माजी आम. अरविंद पाटील, पीएनजीच्या मंजीरी गाडगीळ, अश्विनी गाडगिळ, बीडीसीसीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, संगम कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन बी.बी. पाटील, ता.पं.सदस्य प्रदिप पाटील, विशाल आवटे, महावीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारखान्याला ज्यादा ऊस पुरवठादार सभासद, बिगरसभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच युपीएससीमध्ये राज्यात प्रथम आलेल्या हातरवाट येथील किरण कमते यांचा पत्नी व आई, वडिलांसह सत्कार करण्यात आला.
आम.शशिकला जोल्ले म्हणाल्या, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. यामधून निर्माण होणारी पिके, लागणारी औषधे, देशी जनावारे, आधुनिक मशनीरी याची माहिती मिळावी याकरीता सलग दुसऱ्या वर्षी कृषी संमेलन होत आहे. या भागातील शेतकरी कुंटूबाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. माजी आम.अरविंद पाटील बोलताना म्हणाले, जोल्ले दांपत्यांचे कार्य अविश्वसनीय आहे. त्यांचे काम फार कष्टाचे आहे. ते कोणत्याही क्षेत्रात काम करताना सर्व स्थरावर भक्कमपणे काम करीत असतात. जिल्ह्यातील त्यांचा कार्याचा दबदबा मोठा आहे. जिल्हा बॅकेला 6 महिन्यात 450 कोटीच्या ठेवी मिळवून दिल्या आहेत. 11 शे कोटींचे उदिष्ट असून ते नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे त्यांचे नेतृत्व जिल्ह्यासाठी महत्पपूर्ण असल्याचे सांगितले.
यावेळी स्वामीजींनी आशिर्वचन केले.तर मंजीरी गाडगीळ किरण कमते यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनतर अभंग रिपोस्ट कार्यक्रमांने भक्तीसंगीतात रममाण केले. अभंगाच्या तालावर तरूणाईस वृध्द आणि महिलांनीही ठेका धरल्याचे पाहवयास मिळाले.
दुपारी झालेल्या श्वान स्पर्धत बेळगाव येथील आकाश मुरूडकर यांंच्या श्वानाने 12 हजारांचे प्रथम बक्षिस पटकावले.जयसिंगपूर येथील महेश हितारे यांच्या श्वानाने द्वितीय क्रमांकाचे 8 हजार बक्षिस तर सांगली येथील सतीश जाधव यांच्या श्वानाने तृतीय क्रमांकाचे 5 हजारांचे बक्षिस मिळविले. जयसिंगपूर येथील सुशांत पाटील यांच्या श्वानाने 3 हजार रूपयांचे चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस पटकावले. शिरोळ येथील निलेश मोरे यांच्या श्वानाने पाचव्या क्रमांकांचे 3 हजार रूपयांचे बक्षिस मिळविले.
कार्यक्रमास हालसिध्दनाथचें चेअरमन एम.पी. पाटील, व्हाईस चेअरमन पवन पाटील, बीरेश्वर संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले,यशस्विनी जोल्ले, संचालक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, रामगोंडा पाटील, अविनाश पाटील, समित सासणे, जयकुमार खोत, विनायक पाटील, श्रीकांत बन्ने, रमेश पाटील, विश्वनाथ कमते, प्रकाश शिंदे, राजाराम पाटील, रावसाहेब फराळे, सुहास गुग्गे, सुनील पाटील, गिता पाटील, देवाप्पा देवकाते, आनंदा यादव, रमेश भिवशे, सिद्धू नराटे, बंडा घोरपडे, योगीता घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत बसवप्रसाद जोल्ले यांनी केले तर आभार विजय राऊत यांनी मानले.


