कॅप्टन डॉ. रवींद्र पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी निवड

0
WhatsApp Image 2026-03-19 at 2.59.39 PM

डॉ. पाटील यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव…

कोल्हापूर  (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक व एन.सी.सी. विभागप्रमुख कॅप्टन डॉ. रवींद्र  चुडामणी पाटील (मु. कामेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक (लाईफ वर्कर) निवड झाली आहे.

    डॉ. पाटील यांनी आपले पदवीचे शिक्षण कला महाविद्यालय कोवाड येथून तर पदव्युत्तर शिक्षण  शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेतून पूर्ण केले आहे. ते रयत शिक्षण संस्थेत मे २०१० पासून कार्यरत आहे. यापूर्वी संस्थेच्या पुसेगाव, सावळज ह्या शाखेमध्ये त्यांनी सहायक प्राध्यापक म्हणून सेवा बजावलेली आहे.  

डॉ. रवींद्र पाटील यांच्या निवडीबद्दल मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री. डी. एम. गायकवाड,  सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व विद्यार्थी कर्मचारी त्यांचे अभिनंदन केले. त्याच्या ह्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *