अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला फ्रीस्टाइल  कुस्ती स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजच्या विद्यार्थिनीस  कांस्य पदक

0
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत1

सृष्टी जयवंत भोसले हिने कांस्यपदक  जिंकले.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा, भारत येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूरची विद्यार्थिनी सृष्टी जयवंत भोसले हिने ६५ किलो वजनगटात अटीतटीच्या संघर्षपूर्ण लढतीमध्ये  तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदक  जिंकले.

  यापूर्वी तिने लोहागर ( राजस्थान )  येथे संपन्न झालेल्या  ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये ६५ किलो वजन गटांमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्य पदक पटकावले होते.  तिला शिवाजी विद्यापीठ संघाचे संघ व्यवस्थापक व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे यांचे  मार्गदर्शन लाभले.

     सृष्टी  भोसले हिला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *