रयतच्या शाहू कॉलेजमध्ये २८ मार्चला पालक मेळावा
महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक पालक योजना कार्यरत आहे.
कोल्हापूर, (प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शनिवार दि.२८ मार्च रोजी सकाळी ठीक १०.०० वा. पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक पालक योजना कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांचा संवाद महत्त्वाचा असतो. हा संवाद विद्यार्थी दत्तक पालक योजना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असते. ह्या योजनेअंतर्गत महाविद्यालय प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला येणाऱ्या अडीअडचणी सोडवल्या जातात. त्याला अभ्यासाबरोबरच नोकरीविषयक मार्गदर्शन केले जाते. पुढील महिन्यात सर्व वर्गांच्या विद्यापीठीय परीक्षांना प्रारंभ होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर आजवर आपल्या पाल्याने केलेली प्रगती पालकापर्यंत पोहचावी, विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे. त्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. या मेळाव्यात कला विभागाचे उपप्राचार्य, प्रा. डॉ. ए. पी. उबाळे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. पी. बी. पिस्टे ह्या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो. डॉ. डी.आर. भोसले हे भूषविणार आहेत. मेळाव्याचे समन्वयक म्हणून डॉ. बी. वाय. सायमोते हे काम पाहत आहेत.


