निपाणी बसस्थानाकत महिलांचे दागीने चोरणाऱ्या हरियाणातील 2 जणांना अटक-11 लाख 15 हजाराचे 118 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

निपाणी,ता.26(प्रतिनिधी)-
बसवेश्वर चौक पोलीसांनी निपाणी बसस्थानक परिसरात सोने चोरीच्या घडलेल्या तीन घटनेतील चोरीचा उलगडा केला आहे. या प्रकरणातील दोन आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 11 लाख 15 हजाराचे 118 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. सोनू थेलू (वय 32 रा. रोहत-भिवणी) व सतिश सुल्ता (वय 39 रा. किरोरी-हिसार, हरियाणा) या आरोपीना अटक करून निपाणी न्यायालयात हजर केले असता त्यांची बेळगांव हिंडलगा जेलला रवानगी करण्यात आली आहे.
याबाबात पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, 12 मार्च रोजी दुपारी 1 वा.निपाणी येथील श्रीमती कल्पना मारुती तळस्कर या आपल्या नणंद ललिता शशिकांत इंगळे रा.बोरागाववाडी, यांच्यासोबत पुण्याला जाण्यासाठी निपाणी बसस्थानकात कोल्हापूरच्या बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाल्यामुळे त्यांनी बॅग बसच्या पायरीवर ठेवून बसमध्ये चढल्या.यावेळी समोर बसमध्ये चढलेल्या अनोळखी तरुणाने मदतीचा बहाणा करीतती बॅग घेतली आणि ड्रायव्हरच्या सीटच्या दिशेने गेला. त्याने बॅग त्याच्यासमोर ठेवली आणि तो खाली उतरला.तेव्हा नंणंद ललिता इंगळे यांना बॅगची चेन उघडल्याचे दिसले.तसेच बॅगेत ठेवलेली मेकअपची पिशवी, बॅगेत ठेवेलेले 4 लाख 50 हजार रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ साखळी चोरली. याप्रकरणी कळसकर यांनी तक्रार दाखल केली.
याप्रकरणी बसवेश्वर चौक पोलीसांनी गुन्हा दाखल करून सीपीआय बी. एस.तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रमेश पवार, हावलदार आर.जी.दिवाटे, एम.आर.कांबळे, एम.ए.तेरदाळ, एम. एफ. नदाफ, डी. एम. हिरेमठ, पी.एल.कुदारी, एल.एस.कुदारी,आर.आर. मदने या पथकाने तात्काळ तपास करून हरियाणा राज्यातील हिसार व भिवानी येथे तपास करून दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून मागील वर्षी बसस्थानकात झालेल्या 55 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 4 लाख 15 हजार व 23 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 2 लाख 50 हजार व 12 मार्चच्या 40 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 4 लाख 50 हजार असे आरोपीकडून एकूण 118 ग्रॅम वजनाचे 11,15,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या यशस्वी तपासाबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.


