फॅबटेक मल्टीस्टेटमुळे सांगोल्यासह राज्याच्या अर्थकारणाला गती : ना. जयकुमार गोरे

0
RAJ_7247.JPG (1)

मान्यवरांच्या उपस्थितीत फॅबटेक मल्टीस्टेट सांगोला शहर शाखेचा लोकार्पण सोहळा उत्साहात
सांगली (प्रतिनिधी)
फॅबटेक हे नाव केवळ सांगोला शहरापुरते मर्यादित नसून, उद्योग, शिक्षण, शेती आणि बँकिंग क्षेत्रात त्यांनी संपूर्ण राज्यात आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. फॅबटेक मल्टीस्टेटच्या माध्यमातून शेतकरी, व्यावसायिक आणि महिला बचत गटांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत असून, या संस्थेने राज्याच्या अर्थकारणाला मोठी चालना दिली आहे. पारदर्शक कारभार करणाऱ्या अशा संस्थांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले.

फॅबटेक मल्टीस्टेटच्या सांगोला शहर शाखेचा भव्य लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माढा तालुक्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमात बोलताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पुढे म्हणाले की, “आजच्या काळात बँका किंवा पतसंस्था सुरू करणे सोपे आहे, पण त्या पारदर्शकपणे चालवणे कठीण असते.सांगोला तालुक्यातील रुपनर बंधूंनी ही पारदर्शकता जपल्यामुळेच आज फॅबटेकचे छोटेसे रोपटे एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, रुपनर बंधूंच्या विविध उद्योगांच्या माध्यमातून आज २००० पेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या समूहामुळे होत असून अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम फॅबटेकने केले आहे.”

फॅबटेक मल्टीस्टेटने ग्राहकांसाठी आकर्षक ठेव योजना, सुलभ कर्ज प्रक्रिया आणि डिजिटल बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सांगोला शहर शाखेच्या व आमच्या सर्व शाखांच्या माध्यमातून आता स्थानिक व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहे. उद्योजक भाऊसाहेब रुपनर साहेब यांनी उद्योग आणि शिक्षणाची योग्य सांगड घालत सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेची प्रगती साधली आहे.

सांगोल्यातील राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना ना. पालकमंत्री गोरे साहेब म्हणाले की, “सांगोला ही विकासाभिमुख राजकारणाची पाठशाळा आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांसारखी मंडळी विकासाच्या मुद्द्यावर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात, हे कौतुकास्पद आहे. सोहळ्याला फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. सूरज रुपनर तसेच संस्थेच्या संचालिका सौ. सूरेखा रुपनर, सौ. सुरेख राऊत, संचालक राजाभाऊ रुपनर, दिनेश रुपनर, संजय आदाटे, अमरजीत पुजारी यांच्यासह फॅबटेक परिवारातील कर्मचारी वृंद सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *