निपाणीत 12 रोजी धारपवार बंधू-भगिनी एकत्रीकरण व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
निपाणी,(प्रतिनिधी)-

निपाणीसह सीमा भागातील समस्त धारपवार परिवारातील बंधू-भगिनींचा एकत्रीकरण बैठक व परिचय मेळावा रविवार दि.12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता वाल्मिकी भवन साखरवाडी निपाणी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवर्तक डॉ.भालचंद्र पवार व गोविंदराव पवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमात परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
निपाणी शहरासह सीमाभागातील धारपवार परिवाराचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत राजेपवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष सागरदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर मंगेश पवार हे उपस्थित राहणार आहेत.शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमंत दादाराजे देसाई-निंबाळकर सरकार यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास कोल्हापूर शिवसेना उपनेते संजय पवार, पुरातन आणि शास्त्र शत्र संग्रह व अभ्यासक अमरसिंह पाटील धारपवार उपस्थित राहणार आहेत.शस्त्र प्रदर्शन नामदेव भवन साखरवाडी येथे तर स्नेहमेळावा वाल्मिकी भवन साखरवाडी निपाणी येथे होणार आहे.तरी समस्त धारपवार घराण्यातील समस्त बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.भालचंद्र पवार व गोविंदराव पवार यांनी केले आह.े


