मिरजेत भाजप वर्धापनदिनी मिठाई वाटप
मिरज (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाचा ४७ वा वर्धापन दिन मिरजेत उत्साहात साजरा करण्यात आला. माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपचा ध्वज लावून वंदन करण्यात आले. यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई, पेढे, जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. मिरज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई खाडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, वैभवदादा नलवडे, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक मोहन वाटवे, गणेश माळी, दयानंद खोत, अपर्णा शेटे, विद्या नलवडे, शहराध्यक्ष चैतन्य भोकरे, अभिजित गौराजे, सौ. अनिता हारगे, मयूर नायकवडी, जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र नातू, मनीष देशपांडे, जितेंद्र ढोले, बाळासाहेब होनमोरे, ज्योती कांबळे, अभिजित रजपूत, राजाभाऊ देसाई, रविकांत साळुंखे, राजाभाऊ माने, विक्रम पाटील, रुपाली देसाई, अनघा कुलकर्णी, विवेक शेटे, महादेव नलवडे, सुहास पाटील, बंडोपंत कुलकर्णी, महेश फोंडे, शोभाताई गाडगीळ, विजय केरिपाळे, गोविंद चौगुले, महेश धयारे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, गायत्री सातपुते, सीमा मगदूम, रुपाली कांबळे, रामेश्वरी थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


