बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या रिनाज सनदीचे पोलीस भरतीत यश

0
WhatsApp Image 2026-04-08 at 1.05.36 PM

मिरज (प्रतिनिधी)
कळंबी येथील कु. रिनाज इकबाल सनदी हिने महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस पदाला गवसणी घातली. तिच्या या यशाबद्दल शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.
रिनाज हिने आपले माध्यमिक शिक्षण अजितराव घोरपडे हायस्कूल, कळंबी येथे 92% गुणांसह पूर्ण केले. त्यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे विज्ञान शाखेतून पूर्ण करत इयत्ता बारावीत 79.83% गुण मिळवले. अवघ्या 18 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तिने पोलीस भरतीत हे यश संपादन केले आहे. सध्या ती पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा. प्रा. डॉ. अनिल पाटील सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या यशामागे महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *