कमला कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कमला कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर, ता.14 (प्रतिनिधी) : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. सुजय पाटील, उपप्राचार्य एम. एन. जाधव, ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम, श्रीमती ज्योती लेंगरे, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. तानाजी घागरे, डॉ प्रवीण चौगुले, डॉ. पूजा पाटील, प्रा. महेंद्र जरळीकर, श्रीमती जे एल देशपांडे आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.



