राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे २६ एप्रिलला माजी विद्यार्थी मेळावा
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे २६ एप्रिलला माजी विद्यार्थी मेळावा
कोल्हापूर, (प्रतिनिधी): येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, कोल्हापूर यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. खा. धनंजय महाडिक हे उपस्थित राहणार असून, हा मेळावा श्रीमती सरोज (माई) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. ह्या मेळाव्यात महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या विविध बॅचच्या विद्यार्थ्यांच्या भेटी व उल्लेखनीय यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार संपन्न होणार आहे. ह्या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना कॉलेज भौतिक व शैक्षणिक प्रगती पाहता येणार आहे. त्यांना कॉलेजचे दिवस अनुभवता यावेत त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, गमतीदार खेळ व स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. तरी शाहू कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. आर. भोसले व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. विक्रांत पाटील यांनी केले आहे.


