बांधकाम कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत पाटील यांची निवड
बांधकाम कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत पाटील यांची निवड
सरूड, ता. 14 (प्रतिनिधी): शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील हेमंत धोंडीराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या शाहूवाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड कॉम्रेड आनंदा गुरव तसेच दिनकर लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी धनाजी गुरव, रमेश खोत, अयुब मुजावर, इकबाल मुल्ला, रुपेश कांबळे आणि जोशना बागायत यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हेमंत पाटील यांच्या निवडीमुळे संघटनेत समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


