यश म्हणजे फक्त ट्रॉफी नाही तर समाजाच्या आरोग्याचे आधारस्तंभ बना- पृथ्वीराजबाबा पाटील

0
8375f143-3029-4e34-a89c-3882464714ff

गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल व प्रमिलादेवी पाटील फिजीओथेरपी कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
मिरज दि.२१ (प्रतिनिधी)
गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व प्रमिलादेवी पाटील फिजीओथेरपी कॉलेज चा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सहकार तपस्वी माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्टँड-अप कॉमेडियन सौरभ भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करुन मनोरंजन केले.

प्राचार्य डॉ. प्रताप भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक, कला, क्रीडा व बौद्धिक क्षेत्रात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. आपण सर्व भावी डॉक्टर्स म्हणजे जीपीएमटीचे ब्रँड अम्बॅसॅडर आहात. गेल्या ३४ वर्षात असे साडे तीन हजार डॉक्टर्सना आम्ही जीपीएमटीचे राजदूत म्हणून देशाच्या आरोग्यसेवेत रुजू केले आहेत याचा मला आनंद व अभिमान आहे.

आज या पारितोषिक वितरण सोहळ्यात तुमच्या सांस्कृतिक, कला, क्रीडा व बौद्धिक क्षेत्रातील यशाचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी उपस्थित राहिल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार संस्थापक चेअरमन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी काढले. ते म्हणाले, ‘आपले यश हे मेहनत, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. आजच्या युगात, जिथे जीवनशैलीजन्य आजार वाढत आहेत, तिथे होमिओपॅथीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे फिजियोथेरपी ची गरज समाजात वाढत आहे आणि आपण असे उत्तम फिजिओथेरपिस्ट आपल्या संकुलात घडवत आहोत याचा मला अभिमान आहे.’ तुम्ही सर्व समाजाच्या आरोग्यासाठी एक आधारस्तंभ बनून उभे राहाल, असा विश्वास वाटतो.

या पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धा योजनांपासून बक्षीस वितरणापर्यंत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेले प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देतो. यावेळी प्रा. डॉ. जिनेश्वर यलिगौडा यांना सन २०२४–२५ साठी “बेस्ट एन.एस.एस. प्रोग्राम ऑफिसर” हा पुरस्कार (दुसऱ्यांदा) मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे डॉ. अजित गोपछडे व लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते देण्यात आला होता.

तसेच, डॉ. वैशाली यशवंत सावंत (असोसिएट प्रोफेसर) यांची शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथे प्राध्यापक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या समारंभात गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक गुणवंत तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. “सर्वोत्कृष्ट विद्यार्थी” हा मानाचा पुरस्कार वैष्णवी माळी आणि वैभव पाटील यांना प्रदान करण्यात आला. बेस्ट एनएसएस विद्यार्थी अक्षय जाधव, तन्मय टिपुगडे, सेजल विश्वकर्मा यांना देण्यात आला.

तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. सादिका मौलावी यांना ‘रिपर्टरी’ या विषयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे सुवर्णपदक मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. दत्ताजीराव पाटील व डॉ. शबनम लांजेकर यांचाही गौरव केला. “बेस्ट सपोर्टिंग स्टाफ” पुरस्कार सन २०२४–२५ साठी धनंजय जाधव यांना, तर सन २०२५–२६ साठी अमोल कराडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दोन्ही कॉलेजच्या स्टुडंट कौंसिलचा ही सत्कार करण्यात आला.

याशिवाय “बेस्ट रिसर्च प्रोग्राम” यांसारख्या विशेष पारितोषिकांसाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सर्वांगीण प्रगतीसाठी प्रेरित केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, कॅम्पस समन्वयक डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. बिडीवाले, उपप्राचार्य डॉ सुहास पाटील फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. आकांक्षा जोशी तसेच बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिभिषन कराळे, विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *