कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
IMG_20260422_131756

कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कोल्हापूर, (प्रतिनिधी) येथील कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, व्यासंगी प्राध्यापक व परिवर्तनवादी विचारवंत डॉ. श्रीकृष्ण शंकर महाजन यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. महाजन यांचे आज पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकदरम्यान झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाही त्यांचे निधन झाले. डॉ. महाजन हे प्राध्यापक, संशोधक, कवी, वैचारिक लेखक व प्रभावी वक्ते म्हणून परिचित होते. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम म्हृणाले डॉ. महाजन यांच्या रूपाने आपण एक अभ्यासू, प्रामाणिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना दिशा देत राहील. त्यांनी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दीर्घकाळ अध्यापन करत विद्यार्थ्यांना घडविल्याचेही काम केले आहे असे डॉ. विश्वनाथ यांनी नमूद केले. डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, डॉ. महाजन यांचे व्यक्तिमत्त्व हे ज्ञान, प्रामाणिकता आणि समाजभान यांचा संगम होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे.” यावेळी प्रा. एम. पी. वंडकर, प्रा. दिंडे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. डॉ. महाजन यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *