कन्या महाविद्यालय मिरज येथे माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
येथील कन्या महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा स्नेह मिळावा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आलेल्या मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत हा दिवस अविस्मरणीय केला .
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थी समितीचे प्रमुख डॉ. जे .पी. चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह राजू झाडबुके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. यावेळी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य डॉ. सुनिता माळी, माजी विद्यार्थीसंघाच्या प्रमुख वनिता पवार ,डॉ. माधुरी देशमुख, प्रा. रमेश कट्टीमनी, प्रा.अभिनव औरादकर, आशाराणी चौगुले उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यासाठी तब्बल १०० हून अधिक माजी विद्यार्थिनी नोंदणी केली होती. यामध्ये अगदी सुरुवातीच्या बॅच पासून ते नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पर्यंत अनेकांचा सहभाग होता. आपल्या कॉलेजमध्ये पुन्हा येण्यासाठी सर्वजणी उत्सुक होत्या. पहिल्या सत्रात विद्यार्थिनींच्या परिचयाचा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रत्येकीने सध्या आपण काय करत आहोत याबद्दल माहिती दिली.
महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात केलेले कार्य नोकरी, उद्योग, शिक्षण ,व्यापार ,प्रशिक्षण सेवा आणि गृहिणी म्हणून समर्थपणे धुरा वाहणाऱ्या आदर्श विद्यार्थिनींनी परिचय करून मोलाचा सहभाग नोंदविला. औपचारिक कार्यक्रमानंतर सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये हिंदी गीते कविता लावणी कोळीगीते, नृत्य सादर करून विद्यार्थिनींनी धमाल केली. त्यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत जुन्या मैत्रिणीसोबत संवाद गप्पा मारल्या अशा वातावरणात हा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन डॉ. मधुरा जाधव व प्रा. कोमल काळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.


