मिरजेत रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या मृत्यूचा आरोप

0
WhatsApp Image 2026-05-23 at 9.57.00 PM

मिरज (प्रतिनिधी)
मिरज शासकीय रुग्णालयात शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आणलेल्या रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णाला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर येथे डॉक्टरांनी तपासणी केल्या असता रुग्ण तेथे येण्यापूर्वीच मयत झाला होता. शासकीय रुग्णवाहिकेतून रुग्णाला उपचारासाठी नेत असताना प्रथमोपचार करणे तसेच त्याच्या अवस्थेवर लक्ष ठेवणे हे डॉक्टरांचे काम आहे. मात्र रुग्णवाहिकेतील डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा करत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.

अरविंद प्रकाश कुंभार (वय ३५, रा. देशिंग, ता. मिरज) असे मयत तरुणाचे नाव आहे. या रुग्णास रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र येथे येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये नियुक्त डॉक्टर हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप यामुळे करण्यात आला आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केल्याचेही मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. रुग्णवाहिकेतील नियुक्त डॉक्टरांच्या वर्तणुकीबाबत येथील डॉक्टरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मयत तरुणाच्या आईसह नातेवाईक मिरज शासकीय रुग्णालयात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *