वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कै. प्रा. शरद पाटील यांचे नाव द्यावे

0
WhatsApp Image 2026-05-27 at 9.04.21 PM

विद्यानगर नागरिकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
सांगली (प्रतिनिधी)
विद्यानगर, विश्रामबाग येथील वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आले असून या हॉस्पिटलच्या मंजुरी व उभारणीत कै. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कै. प्रा. शरद पाटील यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर निस्वार्थीपणे कार्य केले. समाजातील वंचित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. त्यामुळे या हॉस्पिटलला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन जपाव्यात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी शशिकांत गायकवाड, रघुनाथ केळकर (अध्यक्ष, क्रांतिसिंह ज्येष्ठ नागरिक संघ, विश्रामबाग), सुमित पाटील, प्रणव पाटील, महादेव जाधव, प्रकाश खोत, दीपक सातपुते, सुनील माने, किरीट अंकल, रतन शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांनी सदर प्रस्ताव महासभेपुढे ठेवून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *