कदमवाडीत सोसायटी सभासदत्वावरून वाद; वृद्धाला काठीने मारहाण

0
WhatsApp Image 2026-09-27 at 1.28.54 PM

मिरज (प्रतिनिधी)

मिरज तालुक्यातील कदमवाडीत सोसायटीत नवीन सभासद करून घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी हिंदुराव चव्हाण (वय ६७) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ ज्ञानू शिंदे, महादेव लक्ष्मण शिंदे, पोपट तुकाराम शिंदे, आबासाहेब लक्ष्मण शिंदे, बाबासाहेब हरिबा शिंदे, हर्षद केदारी शिंदे, सुहास महादेव शिंदे, संगीता दशरथ शिंदे व सुलभा अनिल शिंदे (सर्व रा. कदमवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या मीटिंगमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना सभासद करून घेण्यास चव्हाण यांनी विरोध केला. यावेळी दशरथ शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चव्हाण यांच्या घरासमोर जाऊन काठीने पाठीवर, पोटावर व दंडावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आरोपींनी चव्हाण यांच्या पत्नी व मुलास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोसायटीच्या सभासदत्वाच्या निर्णयावरून झालेला वाद थेट मारहाण आणि धमकीपर्यंत पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *