रविंद्र वस्त्र निकेतनच्या लकी ड्रॉमध्ये चार स्कूटींसह ३० भाग्यवान विजेते
मिरज (प्रतिनिधी)
सलगरे येथील रविंद्र वस्त्र निकेतनच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. नुकताच या भव्य लकी ड्रॉचा सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये मिक्सर, कुकर, दुचाकी यांसह विविध आकर्षक बक्षिसांसाठी एकूण ३० भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली.
लकी ड्रॉमधून तीन स्कूटींची निवड करण्यात आली. यामध्ये पायापाचीवाडी येथील अशोक चव्हाण, सांगली वेस, मिरज येथील विजयानंद खेराडकर आणि कळबर्गी येथील मंजुनाथ बाबर हे भाग्यवान विजेते ठरले.
दरम्यान, रविंद्र वस्त्र निकेतनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मिळालेल्या प्रतिसादाची दखल घेत व्यवस्थापनाने इन्स्टाग्राम फॉलोअर्ससाठीही विशेष सरप्राइज जाहीर केले. श्रीक्षेत्र शिरूर येथील कोंडीबा महाराज यांच्या उपस्थितीत इन्स्टाग्राम फॉलोअर्समधून पारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या निवडीत प्रतीक्षा वाडकर यांची स्कूटीसाठी भाग्यवान विजेती म्हणून निवड झाली.
अशाप्रकारे लकी ड्रॉमधून तीन आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्समधून एक अशा एकूण चार स्कूटी विजेत्यांना मिळाल्या. गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्याला कोंडीबा महाराज, माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, आप्पासो हजारे, तानाजी यमगर, राजेंद्र अथणे, रविंद्र अथणे, सलगरेचे माजी उपसरपंच रमेश माळी, धनंजय कुसनाळे, लक्ष्मण एकुंडे,मकरंद चिखले, पत्रकार प्रवीण जगताप, विशाल जाधव तसेच रविंद्र वस्त्र निकेतनचे आकाश करांडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


