अल्पसंख्यांक विकासासाठी मिरजेत जनजागृती परिषद; विविध मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा

0
WhatsApp Image 2026-09-28 at 5.40.58 PM

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत महा मायनॉरिटी एनजीओ फोरम (एमएमएनएफ) च्या वतीने आयोजित ‘अल्पसंख्यांक विकास जनजागृती अभियान’ अंतर्गत सांगली जिल्हा अल्पसंख्यांक विकास परिषद मिरज येथे उत्साहात पार पडली. परिषदेत अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, संवैधानिक हक्क, शासकीय योजना, रोजगाराच्या संधी तसेच कायदेशीर अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली.

एमएमएनएफचे संस्थापक अध्यक्ष जाकीर शिकलगार (कराड) यांनी एमएमएनएफच्या १५ कलमी अभियानासह संवैधानिक हक्कांच्या पाठपुराव्याबाबत मार्गदर्शन केले. युवक विभागाचे राज्याध्यक्ष इरफान शेख (यवतमाळ) यांनी युवकांच्या योगदानावर, तर राज्य उपाध्यक्ष मारुफ शेख (परभणी) यांनी शिक्षण व्यवस्था व विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांवर विचार मांडले. परिषदेत जिल्हानिहाय अल्पसंख्यांक कक्षांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, जिल्हा वार्षिक निधीत ५ टक्के तरतूद, मार्टी संस्थेला २०० कोटी रुपयांचा निधी व पहिली ते पीएच.डी.पर्यंत शिष्यवृत्ती, तसेच प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदार दर्जाचा स्वतंत्र अल्पसंख्यांक अधिकारी नियुक्त करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी डॉ. सूरज तांबोळी, आयाज भाई नायकवडी, फिरोज शेख, युसुफ मिस्तरी, गुलाम हुसेन बुजरूक, डॉ. तोहीद मुजावर, डॉ. एस. ए. एन. इनामदार, जावेद मुतवली, जहीर मुजावर, मुनाफ अत्तार, मुनीर पटेकर, मेहबूब अली मणेर, तौफिक मौलवी, असिफ मुजावर, सिकंदर शिकलगार, तौसिफ शेख, यासिन मालिदवाले, ॲड. असिफ अत्तार, प्रा. सलीम तेरदाळकर, जोयेद मुल्ला, शाहीन मुल्ला यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *