सांगलीत विज्ञान चळवळीला नवी दिशा; मराठी विज्ञान परिषदेच्या विभागाचा शुभारंभ

0
sangli vidyan parishad

मिरज (प्रतिनिधी)
विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सावरकर विचार दर्शन सभागृहात मराठी विज्ञान परिषदेच्या सांगली विभागाची पहिली बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत विभागाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समन्वयक सुनील देशपांडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची भूमिका, उद्दिष्टे व आगामी उपक्रमांची माहिती दिली. स्वागत व सूत्रसंचालन संदीप वरठा यांनी केले. यावेळी विज्ञान गीत व माहितीपट सादर करण्यात आला.

बैठकीत सांगली विभागाची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्ष सुनील दिलीप देशपांडे; उपाध्यक्ष राजीव गजानन पुजारी, कीर्ती सुजितकुमार काटे, डॉ. भाग्यश्री सौरभ वाटवे; कार्यवाह अतुल गोविंदराव गावडे; सहकार्यवाह श्रीधर बाबाराव सूर्यवंशी, संदीप बबन वरठा, उत्तम गणपती मंगल; कोषाध्यक्ष निरंजन रामचंद्र सोहोनी; सहकोषाध्यक्ष राजेश हिंडसगेरी; प्रसिद्धी विभाग प्रमुख योगेश विश्वास रोकडे, विजय वसंत कोळेकर यांचा समावेश आहे.

मार्गदर्शक म्हणून मोहन यशवंत मद्वाण्णा, दत्तात्रय शिवलिंगआप्पा वर्दे, संतोष सिद्धार्थ कदम, मुकुंद चिंतामणी जोग, तर कृषी विभाग मार्गदर्शक रामकृष्ण सिताराम गंगातिरकर, औद्योगिक विभाग मार्गदर्शक संदीप सोलेय, राहुल प्रभाकर खरे आहेत. महिला संपर्क शशिकला नामदेव शेळके; मार्गदर्शक डॉ. कीर्ती सुजितकुमार काटे; समन्वयक रवींद्र बाबुराव केंचे, संजीव वालावलकर; महाविद्यालय मार्गदर्शक प्राचार्य एस. डी. जाधव, प्रा. सौ. नेहा जोशी यांची निवड झाली.

सदस्य म्हणून संजय हनुमंत करमरकर, विनायक शशिकांत करमरकर, रवींद्र पांडुरंग कानिटकर, दीपक दतवाडकर, योगेश अशोक माने, माधव नारायण वैशंपायन, अरविंद प्रल्हाद गोखले, सौ. गौरी विनय सहस्रबुद्धे, अदिती अनिल पावडे, अक्षता अशोक देवकते, प्रियंका श्रीनिवास शिंदे, सौ. प्रियंका प्रदीप इचलकरंजे यांचा समावेश आहे. यावेळी सभासद नोंदणी करण्यात आली. विज्ञान जनजागृती, विद्यार्थी उपक्रम, व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *