मिरजेत रक्तनिदान केंद्र सुरु करण्याची जिजाऊ ट्रस्टची मागणी

0
WhatsApp Image 2025-03-05 at 12.14.51 AM

मिरज (प्रतिनिधी)
वैद्यकीय पंढरी म्हणून मिरजेची वेगळी ओळख आहे. महापालिकेच्या वतीने रक्तनिदान व चाचणी केंद्र सुरु करावे अशी मागणी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबाबत मनपा सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना जिजाऊ संस्थचे अध्यक्ष धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे.

सांगलीत महापालिकेने २०२१ साली रक्तनिदान केंद्र सुरु केले आहे. त्याच धर्तीवर मिरजेत ही स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणे आवश्यक आहे. मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. येथे नामवंत रुग्णालय असल्याने दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रक्त चाचण्यावेळी खासगी सेवेचा आधार घ्यावा लागतो. सामान्य रुग्णांची यामुळे मोठी आर्थिक परवड होते. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी माफक दारात रक्त तपासणी व निदान करणारे केंद्र महापालिकेने सुरु करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *