मिरजेतील टाकळी रोड येथे तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
WhatsApp Image 2025-03-07 at 8.18.52 AM

मिरज (प्रतिनिधी)

टाकळी रोड येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळकृष्ण अनिल शिंदे (वय 26 रा. टाकळी रोड मिरज) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून गुरुवारी रात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली.

अधिक माहिती अशी कि, बाळकृष्ण शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. नातेवाईकांनी तात्काळ त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरानी मयत असल्याचे घोषित केले. घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या बाळकृष्णने अशी टोकाची भूमिका घेतल्याने परिसरात सर्वत्र आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे बाळकृष्णचे दोन महिन्यापुर्वी लग्न झाले होते. पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *