रामनवमी निमित्त रविवारपर्यंत साईनंदन कॉलनीत राम मंदिर येथे विविध कार्यक्रम – मोहन वनखंडे

0
IMG-20250328-WA0005 (3)

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेतील साईनंदन कॉलनीतील श्री राम मंदिर येथे रविवार दिनांक ६ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मोहन वनखंडे व महापालिका समाज कल्याण समितीच्या माजी सभापती अनिता वनखंडे यांनी दिली. साईनंदन कॉलनी येथील श्री राम मंदिर येथे दररोज हे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

शनिवारी (दि.२९) रोजी श्री सत्यसाई समिती मिरज यांच्यातर्फे रुद्र भजन हा कार्यक्रम, (दि.३०) रोजी श्री सद्गुरु संत बाळूमामा भजनी मंडळाचा व (दि.३१) मार्च रोजी मिरजेतील जय हनुमान भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज मंगळवार (दि.१) एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री माता संतुबाई भजनी मंडळ कानडवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे. (दि.२) रोजी वरदविनायक भजनी मंडळ, दिनांक ३ रोजी निरंकारी सत्संग मंडळ नरवाड, (दि.४) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी भजनी मंडळ मिरज, (दि.५) रोजी मुरलीधर मंदिर भजनी मंडळ मिरज यांचे कार्यक्रम होणार आहेत. दररोज सायंकाळी साडेपाच वाजता हे कार्यक्रम होत आहेत.

(दि.६) एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वैशाली जोगळेकर यांचा भक्ती सुगंध हा कार्यक्रम होणार आहे. दु.१२ वाजता स्त्रीशक्ती नवरात्र मंडळातर्फे आरती करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत राम रक्षा व सायंकाळी साडेसात वाजता पूजा व आरती होणार आहेत. सागर वनखंडे व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. मिरज आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहन वनखंडे व अनिता वनखंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *