सराईत यामाहा दुचाकी चोरटा गजाआड ; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

0
IMG-20250331-WA0452

सांगली (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली. विशेष म्हणजे, तो प्रामुख्याने यामाहा कंपनीच्या दुचाकी चोरीस प्राधान्य देत होता. सांगली शहरातील विविध ठिकाणे, तसेच आष्टा येथून यामाहा दुचाकी चोरणाऱ्या या सराईताकडून ७ लाख २० हजार रुपयांची १२ वाहने स्थानिक गुन्हे अन्वेषणने जप्त केली. संकेत तानाजी ढगे (वय २१, रा. निंबोणी, ता मंगळवेढा, जि.सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत, उदय माळी, बंडा नागणे यांना एक तरुण विना क्रमांकाची यामाहा दुचाकी घेऊन आष्टा- बागणी फाटा परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून ढगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केल्यावर त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यावर त्याने सांगली शहरातील विविध ठिकाणे तसेच आष्टा परिसरातून १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून ११ गुन्हे उघडकीस आणत पथकाने १२ दुचाकी जप्त केल्या. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, विक्रम खोत, केरबा चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, उदय माळी, संदीप नलावडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे,यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *