संस्कार भारती मिरजच्या वतीने रविवारी मिरजेत संगीत मैफिलीचे आयोजन

0
Screenshot_20250403_164308_Chrome

मिरज (प्रतिनिधी)

नवीन वर्षाचे स्वागत आणि ओपी नय्यर या अजरामर संगीतकाराच्या जन्मशताब्दी निमित्त, संस्कार भारती मिरज महानगर समिती व आकाशदीप नेत्रालय प्रस्तुत हिंदी गाण्यांचा एक भव्य आणि बहारदार कार्यक्रम रविवार (दि.६) एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या “पुकारता चला हु मै ” या संगीत मैफिलीत एकापेक्षा एक सरस आणि ठेका धरायला लावणारी गाणी संस्कार भारतीचे कलाकार लाईव्ह आर्केस्ट्रा सोबत सादर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून मिरजकर संगीत रसिकांनी या कार्यक्रमास कुटुंबासह आणि मित्र परिवारासह उपस्थित राहून संगीताचा आनंद लुटावा व संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम वेळेत सुरु होणार आहे. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष ऍड. चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव श्रीधर देसाई व कार्यक्रम प्रमुख ओंकार शिखरे यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *