सावळीतील नव्या ग्रामसचिवालयामुळे गावकऱ्यांना प्रशासकीय सुविधा उत्तम प्रकारे मिळतील – आ.डॉ.सुरेश खाडे

मिरज (प्रतिनिधी)
सावळीतील नव्या ग्रामसचिवालयमुळे गावकऱ्यांना प्रशासकीय सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील, तसेच नवीन रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला सुलभता येईल असा विश्वास माजी मंत्री आ. डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. मिरज तालुक्यातील सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या ४५ लाख रुपयांच्या ग्रामसचिवालय बांधकाम करणे तसेच गणे मळा ते एम. आय. डी. सी. रोड करणे (१५ लाख रुपये) असे एकूण ६० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच सन्मती गणे, उपसरपंच निर्मला कुपवाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग जेष्ठ नेते महादेव चौगुले, दिलीप तांबडे, विजय शिंदे, माजी सरपंच श्रीकांत डोंगरे, माजी उपसरपंच संदीप बंडगर, माजी उपसरपंच रोहित तांबडे, ग्रा. पं. सदस्य दिपक कारंडे, ग्रा. पं. सदस्य बजरंग माळी, प्रदिप बंडगर, उपा शिंदे, पुजा बंडगर, छाया मोरे, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, मुजावर मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले, परशुराम बंडगर, राजेश साळुंखे इ. मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.