आष्टा शहरातून जाणाऱ्या आष्टा – तासगाव, पेठ -सांगली रस्त्यांना गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन : शिवाजीराव चोरमुले

0
WhatsApp Image 2025-04-04 at 7.41.08 AM

आष्टा प्रतिनिधी


आष्टा ते तासगाव, पेठ ते सांगली या आष्टा शहरातून जाणाऱ्या रस्त्यांना गतिरोधक बसवा, दिशादर्शक फलक लावा. अन्यथा आंदोलन करू अशी मागणी आष्टा शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागयांच्याकडे निवेदनद्वारे केली.

निवेदनात म्हंटले आहे की,आष्टा ते तासगाव रस्त्यावरील मुख्य चौकालगत केबीपी इंग्लिश मेडीयम स्कूल व कन्याविद्यालय दोन्ही मोठी महाविद्यालय आहेत. या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून येता जाता जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक गरजेचे आहेत. आष्टा तासगाव मार्गा वरील आष्टा नगरपरिषदेच्या जल शुद्धीकरण प्रकल्प जवळ शहरात जाणारा व तेथून पुढे वाळव्या कडे जाणाऱ्या रस्त्याला गती रोधक बसवणे, दिशादर्शक फलक लावणे अत्यंत गरजेचे बनले आहे या ठिकाणहून ये जा करणाऱ्या या वाहनांचे अपघात होत आहेत.

नव्याने काम सुरु असलेल्या पेठ-आष्टा -सांगली रस्त्यावरील काही ठिकाणच्या वळणावरती, रुकडे कमान, झंवर कमान, ढोले कमान, रामनगर रोड, धनगर राजा गणेश मंडळ, आटुगडे मळा या ठिकाणी गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.मागणीची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आष्टा शहर युवक काँग्रेस शरद पवार पार्टीच्या वतीने कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, माजी नगरसेवक दीपक मेथे, अध्यक्ष राजू माने, प्रकाश सिद्ध उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *