प्रलंबित कामाना तत्परतेने गती देऊ : प्रवीण माने

0
WhatsApp Image 2025-04-04 at 7.40.16 AM

लांडे प्लॉट येथील वाडकर दुकान ते बसुगडे घर दरम्यानच्या रस्ता डांबरीकरण कामाचा उत्साहात शुभारंभ

आष्टा (प्रतिनिधी :डॉ तानाजी टकले)

निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून आष्टा शहरातील प्रलंबित कामांना गती मिळत आहे. विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न करता नागरिकांच्या मागणीचा आणि गरजेचा विचार करून शहरात विकास कामे सुरू केली आहेत, असे प्रतिपादन निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे संस्थापक प्रवीणभाऊ माने यांनी केले.

लांडे प्लॉट येथील वाडकर दुकान ते बसुगडे घर दरम्यानच्या रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सतीश बापट, डॉक्टर महेश पाटील, संदीप गायकवाड, संजय सावंत, राहुल थोरात, नरेश घाडगे,अक्षय औघडे,रवी चव्हाण, अमोल चाळके, मारुती मोरे, राहुल टोमके, अक्षय घस्ते ,प्रेम चव्हाण, बिटू पांढरे, भैय्या मंडले, विशाल थोटे, विक्रम लोखंडे,सोयब संदे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रवीणभाऊ माने पुढे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या सहकार्याने आणि निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रयत्नातून लांडे प्लॉट येथील वाडकर दुकान ते बसुगडे घर दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणासाठी वीस लाख 29 हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी या परिसरातील नागरिकांची तसेच व्यापारी बांधवांची मागणी होती. या मागणीचा विचार करून रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करीत आहोत. हा रस्ता दर्जेदार होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षात आष्टा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून झाले आहे. यापुढील काळातही आष्टा शहराच्या विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे.

डॉ. सतीश बापट म्हणाले, निशिकांत भोसले पाटील आणि प्रवीणभाऊ माने यांच्या माध्यमातून आष्टा शहरात अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत. सर्व कामे दर्जेदार झालेली आहेत. सर्वसामान्य जनता प्रवीणभाऊ माने यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शहरातील सर्वसामान्य माणसाला सन्मान मिळवून देण्याचे काम प्रवीणभाऊ माने यांनी केले आहे. स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. महेश पाटील यांनी केले. रवी चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *