केंब्रिज स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात

मिरज (प्रतिनिधी)
येथील केंब्रिज स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदमय वातावरणात झाली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचे आनंदी आणि उमद्या चेहऱ्यांनी नव्या सुरुवातीचा उत्सव साजरा केला. पहिल्या दिवशी शाळेत विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेतले. त्यानंतर फोटो पूजन झाले.

शाळेत प्रवेश केलेल्या नवीन मुलांचे गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच नवीन शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.क्रिस्टिना मार्टिन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेआणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या संधी व आव्हानांवर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळा आणि उपक्रमांचे नियोजन केले आहे. कार्यक्रमावेळी शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी सर, उपमुख्याध्यापिका सौ.पद्मा सासणुर मॅडम आणि पर्यवेक्षिका अश्विनी येळकर मॅडम यांनी मुलांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शितल कुरणे मॅडम यांनी केले.