‘करिअर कट्टा’ उपक्रमासाठी मिरजेतील कन्या महाविद्यालयास चार पारितोषिके

0
IMG-20250406-WA0010

महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्रा.रमेश कट्टीमणी जिल्हा व महाविद्यालयीन समन्वयक या दोन्ही गटातून प्रथम

मिरज (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमासाठी मिरजेतील कन्या महाविद्यालयास सांगली चार पारितोषिके मिळाली. करिअर कट्टा कोल्हापूर विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा कमला कॉलेज, कोल्हापुर येथे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष शिरीष शितोळे, ताराराणी विद्यापीठाचे सचिव डॉ. क्रांतिकुमार पाटील, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. एस. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयात हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जातो. यासाठी करिअर संसद कार्यरत आहे. करिअर कट्टयाच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन महाविद्यालयास सांगली जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून द्वितीय क्रमांकाने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. उल्हास माळकर यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्रा. रमेश कट्टीमणी यांना सांगली जिल्हा उत्कृष्ठ तालुका समन्वयक तसेच उत्कृष्ठ महाविद्यालयीन समन्वयक या दोन्ही गटातून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजू झाडबुके, संस्था पदाधिकारी, जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. पूजा नरवाडकर, माजी जिल्हा समन्वयक डॉ. दत्तात्रय येडगे, डॉ. भास्कर ताम्हणकर व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *