ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत फॅशन डिझाईन कार्यशाळा सुरु

0
WhatsApp Image 2025-04-16 at 7.58.51 PM

मिरज (प्रतिनिधी)

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बी. ओ. आय. स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर रोड, डॉ. बापुजी साळुंखे कॉलेजच्या पाठीमागे, रमा उद्यान शेजारी, मिरज येथे ३१ दिवस “मोफत महिलांसाठी वस्त्रालंकार /फॅशन डिझाईन” प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचे उत्पन्न वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून “महिलांसाठी वस्त्रालंकार / फॅशन डिझाईन” चे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम जसे कि साडीचे प्रकार झिग-झॅक (मस्तानी), काष्टा, नववार, पेशवाई इ., शाळेचे मुला मुलींचे युनिफॉर्म, लहान मुलींचे फन्सी फ्रॉक व ड्रेस इ., फॅन्सी ब्लाऊज चे सर्व प्रकार, ड्रेस डिझायनिंग- वनपीस, चुडीदार, पंजाबी, पटियाला, राजस्थानी, आणारकली टॉप, अपल कट टॉप, आमरेला टॉप, सलवार पंजाबी, पटियाला, राजस्थानी, धोती पॅन्ट, बलून पॅन्ट, पिको फॉल, पेटीकोट, साधा व कळीचा परकर, इतर अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासह शिकवला जात आहे तसेच व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विपणन व्यवस्थापन, विविध शासकीय योजने बाबत माहिती आणि मार्गदर्शन केले जात आहे.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन मिरजेत आरसेटी संचालक महेश पाटील आणि प्रशिक्षिका सौ. शीतल देसाई यांच्या हस्ते झाले. संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित १२ दिवसीय फास्ट फूड, लघु उद्यमी, २० दिवसीय पापड, लोणचे व मसाला पावडर बनवणे या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन आरसेटीचे प्रशिक्षक प्रदीप साळुंखे व प्रवीण पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *