गजानन पाटील यांना काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे ‘मंगल मदन फडणीस स्मृती प्रेरणा पुरस्कार-२०२५’ घोषित

0
490549860_3900549990204434_9050496750655685251_n

मिरज (प्रतिनिधी)
प्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार, शिक्षक गजानन पाटील यांना काव्यप्रेमी शिक्षक मंचतर्फे ‘मंगल मदन फडणीस स्मृती प्रेरणा पुरस्कार-२०२५’ घोषित झाला आहे. हा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर सभागृह, चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे ११ मे रोजी प्रदान केला जाणार आहे.


गजानन पाटील यांचा ‘गजनीती’ हा कविता संग्रह प्रकाशित असून ते अभिनव प्राथमिक शाळा, सांगली येथे सहायक शिक्षक या पदावर कार्यरत असून, त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘वादळ हिरोईनचा बाबा’ गजानन पाटील व आगामी ‘झिंग’ चित्रपट असून ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘जुळता जुळता जुळतंय की’ अशा टीव्ही मालिकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *