मिरजेत सोमवारी ऑर्केस्ट्रा स्वरांजली हिंदी मराठी चित्रपट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम

मिरज (प्रतिनिधी)
शहरात सोमवारी (दि.२८) एप्रिल रोजी रात्री आठ वाजता बालगंधर्व नाट्यगृहामध्ये, ऑर्केस्ट्रा स्वरांजली हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बहारदार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आरपीआय अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांची कन्या कुमारी ऐश्वर्या अशोक कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अशोक कांबळे आणि प्रसाद हेगिष्टे निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरांजली या कार्यक्रमांमध्ये मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर येथील नामवंत गायक आणि वादक यांचा अप्रतिम परफॉर्मन्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तरी ऑर्केस्ट्रा स्वरांजली या बहारदार गाण्याच्या कार्यक्रमांस सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजीत आठवले आणि अशोक कांबळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.