मिरजेत ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात

उद्योजक विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
येथील डायनामिक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनकडून उद्योजक विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त “ओपन कराटे चॅम्पियनशिप” स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील आणि उपाध्यक्ष उदयसिंग घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, त्यांच्या कराटे कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.
स्पर्धकांनी त्यांच्या कराटे कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली आहेत. विविध वयोगटांमध्ये झालेल्या जोरदार लढतींमध्ये खेळाडूंनी त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताकदीचेही दर्शन घडवले. अशा स्पर्धांकरिता पुढील काळात ही तत्परतेने सहकार्य राहील अशी ग्वाही उद्योजक विनायक यादव यांनी दिली.
प्रथम क्रमांक नितीन एडके (कुंडल), द्वितीय क्रमांक प्रीतम कराटे क्लब (अथणी) तर तृतीय क्रमांक अजित शिंदे (ब्रूसली कराटे फायटर क्लब,मिरज) यांनी पटकावला. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.