कांडगावच्या उपसरपंचपदी सुवर्णा गायकवाड यांची बिनविरोध निवड

हळदी (प्रतिनिधी )
कांडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा बाळासो गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच वैष्णवी नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी काकासाहेब पाटील यांनी काम पाहिले. सरपंच तेजस्विनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली.
नवीन उपसरपंच सुवर्णा गायकवाड यांचा ग्रामपंचायतीतील प्रशासन व विकास कामांमध्ये अनुभव असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
या वेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका वैष्णवी नाईक, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक उदय चव्हाण, बाबुराव चव्हाण, सुकुमार पाटील, राजेश नाईक, सदाशिव आनकर आदी मान्यवर उपस्थित होते.