हॉस्पिटलमधील हिंसाचार’ या विषयावर विशेष परिसंवाद संपन्न

0
Medical Association News Photo 2

कोल्हापूर:  (प्रतिनिधी)

  ‘हॉस्पिटलमधील हिंसाचार’ या अतिमहत्त्वाच्या विषयावर एक विशेष परिसंवाद नुकताच संपन्न झाला. या परिसंवादाचे आयोजन “प्रायव्हेट हॉस्पिटल आणि नर्सिंग होम असोसिएशन (PHANHA),  कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, नीमा (आयुर्वेदिक डॉक्टर्स संघटना), होमिओपॅथी असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांचे प्रतिनिधी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार यांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधला. त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी टिके, पोलिस निरीक्षक चव्हाण, दोके, झाडे आणि सागरे या चारही शहर पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. परिसंवादात डॉ. राजेंद्र अभ्यंकर यांनी “हॉस्पिटलमधील हिंसाचार – कारणे, परिणाम आणि उपाय” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी असे नमूद केले की सध्याच्या सामाजिक आणि कायदेशीर परिस्थितीत डॉक्टरांना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण देणे अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार यांनी उपस्थित डॉक्टरांना आश्वस्त केले की, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये झालेल्या अप्रिय घटनेत पोलीस प्रशासन तात्काळ हस्तक्षेप करेल आणि डॉक्टर संरक्षण कायदा २०१० (महाराष्ट्र) नुसार कठोर कारवाई केली जाईल. स्वागतपर भाषण अध्यक्ष डॉ. उदय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भरत कोटकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. हृषिकेश अभ्यंकर यांनी केले. प्रायव्हेट हॉस्पिटल आणि नर्सिंग होम असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि डॉ. निरंजन शाह यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाला डॉक्टर संघटनांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *