शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही – मा. आम. सत्यजित पाटील

0
IMG-20250813-WA0049

 

   . सरूड ( प्रतिनिधी )

            सध्याच्या महायुती सरकारने फक्त निवडणुकीपुरत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी यांच्यासाठी लढा थांबणार नाही असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी सरूड येथे कर्जमुक्ती दिंडीच्या कार्यक्रमा वेळी बोलताना केली 

  यावेळी कर्जमुक्ती दिंडीचे प्रमुख सह संपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले की महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे हित न बघता शेतकऱ्यांच्या शेतीवर उठून शक्तिपीठ महामार्गासारखा घाट घालून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाऊ पाहत आहे शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणाबाजी करून शेतकऱ्याला लुबाडण्याचे काम करत आहे पण आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आमचा लढा कायम ठेवीन असे मत विजय देवणे यांनी व्यक्त केले.

  यावेळी सरूड येथील कर्जमुक्ती दिंडीसाठी प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार, उपप्रमुख दिनकर लोहार, महिला तालुकाप्रमुख अलका भालेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंबीरराव पाटील, जालिंदर पाटील, नामदेव पाटील, विभाग प्रमुख हेमंत पाटील, सरपंच भगवान नांगरे, उपसरपंच वंदना पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय पाटील, रामदास घोलप यांच्यासह तालुक्यातील शेतकरी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *