गगनबावड्यात मुसळधार पाऊस कोल्हापूर- गगनबावडा वाहतुक बंद

गगनबावडा (प्रतिनिधी)
गगनबावडा तालुक्यामध्ये गेले चार दिवस सतत जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे .या पावसामुळे कातळी, सांगशी , पळसंबे, अंदुर-शेणवडे जुना पुल, मांडुकली व वेतवडे इत्यादी बंधारे पाण्याखाली गेले असून खोकुर्ले, शेणवडे, मांडूकली व लोंघे या ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला आहे .
गगनबावडा तालुक्यामध्ये गेले तीन ते चार दिवस अति मुसळधार पाऊस सुरू असुन गगनबावडा तालुक्यात गेल्या २४ तासात ३०५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हंगामी पर्जन्यमान ४३५० मि.मी. नोंद झाली आहे. अंदुर , वेसरफ व कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यात कुंभी धरणातून २९१० , कोदे धरणातुन १९९८ , अंदूर ८०० व वेसरफ ८०० या धरणातुन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. काल रात्री कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील खोकुर्ले, शेनवडे, मांडूकली, किरवे व लोंघे या ठिकाणी महामार्गावर पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी रात्री १० वाजता पोलीस ठाण्याकडून गगनबावड्यात व कोल्हापूर साईटला लोंघे येथे बॅरिकेट लावून बंद करण्यात आला.
यामध्ये मांडुकली येथे अंदाजे रस्त्यावरती ४ फूट पाणी असून शेणवडे येथे अंदाजे २ फूट पाणी आहे . किरवे येथील म्हसोबा जवळ पाणी पातळी वाढत आहे.