क्रिकेटर रोहित सुतार याची श्रीलंका क्रिकेट दौऱ्यासाठी निवड

१९ वर्षाखालील टीम टी २० व एक दिवशी क्रिकेट मालिकेसाठी निवड.
गगनबावडा (प्रतिनिधी) गवशी तालुका राधानगरी येथील रोहित बंडोपंत सुतार या खेळाडूची श्रीलंका येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील टी-२० व एक दिवशीय क्रिकेट मालिकेसाठी निवड झाल्याबद्दल गवशी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. क्रिकेट टीममध्ये निवड होणे ही खेळाडूसाठी एक मोठी आणि अभिमानाची बाब असते. रोहित सुतार यांची निवड ही वेध स्पोर्ट अकॅडमी यांच्यामार्फत करण्यात आली असून श्रीलंका येथे होणाऱ्या भारत, श्रीलंका व बांगलादेश यांच्यामध्ये दोन एक दिवशीय व चार टी २० क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटर रोहित यांचा गवशी येथील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
क्रिकेटर रोहित सुतार याला लहानपनापासुनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात इथेपर्यंत पोचून यश मिळवण्याचे काम केले आहे. याला वेध क्रिकेट स्पोर्टचे कोच राम कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामध्ये त्याच्या अनेक मित्रांचे व त्यांच्या वडिलांचे तसेच गवशी गावातील अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
१