बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा

‘महाबोधी महाविहार मुक्ती‘ मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जिल्हा बैठक सर्किट हाऊस मध्ये पार पडली.
कोपार्डे (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण देशभरात एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चाला’ कोल्हापूरातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने (वाघमारे गट) देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी (ता.१७) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जिल्हा बैठक ‘सर्किट हाऊस’ येथे पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कृष्णात कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.१४) पार पडली. बैठकीमध्ये ‘महाबोधी महाविहार मुक्ती’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले असून या ‘महाबोधी महाविहार मुक्ती’ मोर्चाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या (वाघमारे गट) कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष सुरेश वाडेकर साहेब यांनी केले आहे.
यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक तानाजी कांबळे, जिल्हा संघटकसचिव प्रशांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी पोवार, करवीर तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, पन्हाळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष दगडू कांबळे, भारतीय सम्यक क्रांती कला प्रबोधिनी चे कार्याध्यक्ष सुरेश शिंदे, हातकणंगले तालुकाध्यक्ष संजय कांबळे, कार्यकारिणी सदस्य महावीर सकटे, भुदरगड अध्यक्ष रामदास कांबळे, राधानगरी अध्यक्ष एकनाथ कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.