महसूल सेवा पंधरवड्यात शाहूवाडी तालुक्यातील पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त होतील प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे

करंणजोशी येथे ग्रामसभेच्या वेळी अभियानाची माहिती देताना तहसीलदार गणेश लव्हे
सरूड.(प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यात सुरू असलेल्या महसूल सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारा उपक्रम तालुक्यातील गावागावातील लोकांच्या पर्यंत पोहोचावेत व त्याचा लाभ मिळावा यासाठी शाहूवाडी तालुक्यातील गावागावात ग्रामसभेचे आयोजन करून या पंधरवड्याचे महत्त्व व शासनाकडून मिळणाऱ्या योजनेची माहिती देऊन तालुक्यातील शेती शिवारामध्ये जाणारी पानंद रस्ते खुले करण्यासाठी पानंद रस्त्यांचे नकाशाप्रमाणे मोजणी करून अतिक्रमण मुक्त करून ती खुले करणार असल्याची माहिती सरूड मंडळाच्या वतीने करंजुशी येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या वेळी बोलताना प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली.
शाहूवाडी तालुक्यात महसूल सेवा पंधरवडा गतीने राबवण्यासाठी नायब तहसीलदार नरेंद्र गायकवाड, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, मंडल अधिकारी विकास जाधव उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत शासनाच्या सर्व योजना गावागावात पोहचवण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. अशी माहिती दिली. या पंधरवड्यामुळे शेत शिवारातील पानंद रस्ते खुले होणार असल्याने शेतक-यांना शेती शिवारात जाण्यासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे.