सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे हँडबॉल स्पर्धेत दुहेरी यश, विभागीय स्पर्धेसाठी निवड

सांगरूळ हायस्कूलच्या विजयी हँडबॉल संघासमवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर
सांगरूळ. (प्रतिनिधी) महाराष्ट् हायस्कूल कोल्हापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने अव्वल कामगिरी करत मुले व मुली दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत मुलांच्या संघाने महात्मा फुले हायस्कूल कन्नूर या संघाचा तर मुलींच्या संघाने तात्यासाहेब कोरे हायस्कूल कोडोली यांचा पराभव करत दुहेरी यश संपादन केले आहे आणि जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या विजयी संघात प्रथमेश नाळे, अजित कोळी, धीरज गोसावी, गुरुराज वागवेकर, साहिल डकरे, सोहम डकरे, वक्रतुंड जाधव, यश जाधव, गणेश पाटील, गणेश माणगुरे, राजविर कासोटे, अनुराज नाळे, अभिराज पाटील व श्रेयनशू सनगर या खेळाडूंचा पूर्वा झुरे मयुरी खाडे सायली नाळे समृद्धी नाळे ऐश्वर्या नाळे सिमरन कांबळे लक्ष्मी नाळे प्रशवंसा कांबळे अनुराधा मिसाळ वैष्णवी मोहिते धनश्री मोहिते जोती खाडे अक्षता खाडे समावेश आहे. या खेळाडूंना जिमखाना विभाग प्रमुख आय. एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे उपाध्यक्ष के. ना. जाधव सहसचिव डी एन कुलकर्णी खजिनदार डी. जी. खाडे व संचालक मंडळ प्राचार्य एस. एम. नाळे उपप्राचार्य एस. एस. मोरे, एस. व्ही. कुंभार, बी. पी. खाडे, प्रल्हाद खाडे, मारुती यादव यांच्या सह शिक्षक कर्मचारी व पालकांचे प्रोत्साहन लाभले. पुणे विभागाचे आमदार जयंत आसगावकर यांनी क्रीडांगणावर प्रत्यक्ष भेटून या विजयी संघाचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.